काेणत्याही गाेष्टी चांगल्या मार्गाने मिळवण्याचा नेहमी प्रयत्न करावा

    16-Apr-2026
Total Views |
 
 

happy 
चांगल्या मार्गाने मिळवलेल्या गाेष्टी दीर्घकाळ टिकतात, असे नेहमी म्हटले जाते. म्हणजे ज्येष्ठ मंडळी नेहमी असे सांगतात की, आपल्याला काेणतीही गाेष्ट मिळवायची असली तरी त्यासाठी नेहमीच चांगले मार्ग पत्करले पाहिजेत.हे मार्ग काहीसे कठीण आहेत, असेही वाटू शकते; पण हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की, काैतुक किंवा सन्मान हा अशाच चांगल्या मार्गाने चालणाऱ्यांचा हाेत असताे.हा असा चांगुलपणाचा मार्ग चालणे फार कठीण असते. तरीही ताेच मार्ग आदर्शवत आणि सन्माननीय असताे. या अशा चांगुलपणाला काही लाेक साेन्याची उपमा देतात.असाही अनुभव आहे की,
 
साेन्यालादेखील स्वतःची याेग्यता सद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावीच लागते. साेन्यालाही अग्नीच्या ज्वाळांमधून तावूनसुलाखून निघावे लागतेच.
 
 हिरा हा काेळशाच्या खाणीत सापडताे.तरी त्याला खरी किंमत येते ती पैलू पाडल्यावरच. पैलू पाडून घेण्याचा त्रासही हिऱ्याला सहन करावा लागताेच.थाेडक्यात म्हणजे साेन्याला खाणीमधून बाजारात येईपर्यंतचा किंवा हिरा हा खाणीतून बाजारात येणे आणि त्याला किंमत मिळणे, हा मार्गदेखील साेपा नसताे; पण हेही खरेच आहे की, हा चांगुलपणाचा आणि तावूनसुलाखून निघण्याचा प्रवास केल्यानंतरच त्याला चांगली किंमत मिळते.