विरार-अलिबाग प्रकल्पासाठी केंद्र निधी देणार

    14-Apr-2026
Total Views |
 

virar 
 
बहुप्रतिक्षित विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गाच्या बांधकामासाठी केंद्र सरकार 6 हजार काेटींचा निधी देणार आहे.व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून हा निधी मिळणार आहे. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केंद्राला प्रस्ताव पाठवला असून, त्याला मान्यता मिळताच बीओटी तत्त्वावर कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. हा मार्ग मुंबई महानगरातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग असेल.एमएसआरडीसी हा 96.5 कि.मीचा हा मार्ग उभारणार असून, त्यासाठी 53 हजार काेटींचा खर्च येणार आहे. यात भूसंपादनासाठी सुमारे 22250 काेटींचा खर्च येणार आहे, तर प्रत्यक्ष बांधकामासाठी 31 हजार काेटींचा खर्च अपेक्षित आहे.
 
यापूर्वी एमएसआरडीसीने या मार्गासाठी ईपीसी तत्त्वावर निविदा काढली हाेती.त्यावेळी निविदा 36 ट्नके अधिक दराने आल्याने ती रद्द केली हाेती. आता या मार्गाची उभारणी बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलीभूसंपादनाचा खर्च हुडकाेकडून कर्ज घेऊन भागवला जाईल. बांधकामासाठी येणारा 31 हजार काेटींच्या खर्चापैकी 19.8 ट्नके म्हणजेच 6259 काेटी रुपये व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून केंद्राकडून घेतले जाणार आहेत. याला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली.