कर वसुलीसाठी महापालिकेची माेहीम; सिडकाे रेल्वे, टाॅवर्ससारख्या थकबाकीदारांवर लक्ष

    14-Apr-2026
Total Views |
 

tax 
 
शहरातील वाढत्या मालमत्ता कर थकबाकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुढील तीन महिन्यांत व्यापक वसुली माेहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांकडून मालमत्ता कराची वसुली करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही आयु्नत डाॅ. कैलास शिंदे यांनी महासभेत दिली. करवसुलीशिवाय विकासकामे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात 876 काेटींची विक्रमी वसुली करूनही महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरातील 1 लाख 58 हजार 251 मालमत्ताधारकांकडे 2915 काेटी 86 लाखांची थकबाकी आहे.
 
त्यात मूळ कराची र्नकम 1127 काेटी 73 लाख रुपये असून, दंड व व्याजाचा आकडा 1718 काेटी 12 लाखांवर गेला आहे. म्हणजेच थकीत करापेक्षा दंड व व्याजाचा बाेजा अधिक झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या सदस्यांनी या वषयावर प्रशासनाला जाब विचारत ठाेस उपाययाेजना करण्याची मागणी केली.करवसुलीसाठी विशेष पथके तयार करून थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येईल; तसेच माेठ्या थकबाकीदारांकडून वसुलीला प्राधान्य दिले जाईल, असे आयु्नतांनी सांगितले.थकबाकीदारांच्या यादीत शासकीय संस्थांचाही समावेश असल्याची बाबही सभागृहात पुढे आली. सिडकाेकडे सुमारे 247 काेटी, रेल्वेकडे 37 काेटी आणि वीज विभागाकडे 15 काेटींची थकबाकी आहे; तसेच शहरातील सुमारे 1200 माेबाइल टाॅवरकडे 387 काेटी थकीत आहेत.