मीरा-भाईर्ंदर महापालिकेच्या (एमबीएमसी) 16 स्मशानभूमींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी (8 एप्रिल) संध्याकाळी मीरा राेडवरील जाॅगर्स पार्कजवळील स्मशानभूमीत प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करून एक अनाेखे आंदाेलन केले.या घटनेमुळे एमबीएमसीच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.यावेळी कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि त्यांचा थकीत पगार देण्याचे काम सुरू करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (8 एप्रिल) संध्याकाळी प्रतीकात्मक ताटीवर झाेपून आंदाेलन केले.
या घटनेचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला. आम्ही केवळ स्मशानभूमीची देखभालच करत नाही, तर अंत्यविधीसाठी येणाऱ्या लाेकांना आवश्यक मार्गदर्शनगितले की, एमबीएमसीच्या 16 स्मशानभूमींमधील काही कर्मचारी अधिकृत वेतनपटावर नियु्नत आहेत; परंतु बहुतेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात.संबंधित कंत्राटदाराने गेल्या दाेन महिन्यांपासून पगार न दिल्याने सुमारे 32 कर्मचारी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.त्यांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे, कुटुंबावरील आर्थिक भार वाढला आहे. वारंवार निवेदने देऊनही कंत्राटदार आणि एमबीएमसीकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही स्मशानभूमीत जमून आंदाेलन केले.