दिवसा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवेचा वापर करावा. दिवसा शकयताे विजेचा वापर प्रकाश आणि वाऱ्यासाठभ करू नये. एअरकंडिशनर, कूलर, हीटर, पंखे इ. गरज असेल तरच वापरावेत.
रात्री फक्त त्याच रूममध्ये प्रकाश ठेवावा जिथे काही काम चालू असेल. इतर रुम्समधील दिवे व पंखे बंद ठेवावेत.
पाणी तापवण्यासाठी गीझरऐवजी इमर्सन वाॅटर हीटर वापरून विजेचा खप कमी करता येऊ शकताे.
एअर कंडीशनर, कूलर, हीटर, पंखे इ.चा माेसमी तापमानानुसार कमीत कमी वापर करावा. कार्यालयाची वेळ संपताच ही उपकरणे बंद करा.कार्यालय बंद झाल्यानंतर फक्त सुरक्षेसाठी आवश्यक दिवे साेडून सर्व दिवे बंद करावेत.
गरम खाद्यपदार्थ थंड झाल्यानंतरच िर्फ्रजमध्ये ठेवा. फ्रिजचे दार पूर्ण उघडू नका. कमीत कमी उघडा. फ्रिजमध्ये जर बर्फाचा थर पाव इंचापेक्षा जाड झाला तर डिफ्रास्ट करून घ्या. नियमित डिफ्रास्टमुळे ऊर्जेचा खप कमी हाेताे. फ्रिजचे गास्केट लायनिंग तपासा. जर ते घासले गेले असेल वा फाटले तुटले असेल तर बदला.
लग्नसमारंभासारखे सामाजिक व इतर धार्मिक कार्यक्रम श्नयताे दिवसाच करावेत.
जेवढी जास्त वीज वाचवाल तेवढीच पैशाचीही जास्त बचत हाेईल हे लक्षात ठेवा.