प्रत्येक माणसाला काही ना काही व्याप वाढवायची सवय असते. अगदी नेमस्तपणे चाैकाेनी आणि चाैकटीत वागणारी माणसे ार कमी असतात. श्रीसमर्थांच्या दृष्टीने उपाधी म्हणजेच लाेकसंग्रह करण्याचा व्याप आणि ताे चांगल्या रीतीने यशस्वी करावा, असा त्यांचा आग्रहही आहे. परंतु ताे उद्याेग साधासीधा नसून धकाधकीचा असल्याने ज्याला ताे करण्याचे सामर्थ्य असेल, त्यानेच ताे करावा आणि त्याला ताे यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता नसेल, त्याने त्या व्यापात पडू नये, उपाधी वाढवू नये, असेच त्यांचे सांगणे आहे. श्रीदासबाेधाच्या एकाेणिसाव्या दशकाच्या ‘उपाधिलक्षणनिरूपण’ समासात त्यांनी याचे सर्वांगीण मार्गदर्शन केलेले आहे.
सृष्टीमध्ये अनेक माणसे असून प्रवास करीत राहिले म्हणजे त्यांचे अनेक नमुने व वेगवेगळे विचार माहीत हाेत जातात. काही माणसे प्रपंचात असूनही उदासीन व तटस्थ वृत्ती सांभाळतात व सुखदु:खाने विचलीत हाेत नाहीत. काहींना उपजतच वक्तृत्वाचे, तर काहींना वर्तणुकीचे, तर काहींना संगीत व अभिनयाचे ज्ञान असते. अचानकपणे एखादा पराक्रमी व सर्वगुणसंपन्न असूनही नीतिन्यायाने वागणारा व लाेकप्रिय माणूस भेटताे. असा गुणग्राहक व प्रचितीचा माणूस भेटला, की त्याच्या ठायी महंताची सर्वच लक्षणे प्रत्ययास येऊन आपाेआपच आदर वाटू लागताे. त्याला काहीही लांडी लबाडी न करता धडाक्याने सर्व कार्य सहजपणे करता येते. अशा पूर्वसुकृतांच्या लाेकांना काहीही अभ्यास न करतासुद्धा दैवदत्त उपजत गुणांमुळे सर्व गाेष्टी बराेबर जमतात.