ओशाे - गीता-दर्शन

    14-Apr-2026
Total Views |
 
 
osho
 
आता जर आपण यात आणखीन पुढे गेलाे, तर फुटून विखरून आपण खलास हाेणार, पुन: परतायला पण येणार नाही, अजिबात. हा अनुभव इतका प्रगाढ असताे की ताे आपला सारं प्राण व्यापून टाकताे. आपणाला कासावीस करताे आणि त्यामुळे आपण व्याकूळ हाेऊन जाताे. बाहेर पळून जाताे. हे राेज घडतं.म्हणूनं जे साधकाला मार्गदर्शन करतात त्यांनी त्या साधकाला उद्देशून ‘भय साेडून द्या, मृत्यू घटित हाेईल’ असे म्हणते राहणं उचित आहे. ताे क्षण येईल. आता भीती कब्जा घेईल.असं वाटेल की गेलं. सगळं सगळं खलास झालं, सार संपलं. मी सागरात बुडून गेलाे, गहन खाेलात मी चाललाे, आता परतता येणार नाही. असं मधून मधून म्हणत राहिल्यानं, अशी सूचना मिळाल्यानं हिय्या, हिंमत करण्याची बुद्धी साधकाला हाेऊ शकते. ताे सगळं साहस एकवटून सूर मारू शकताे. जर ही सूचना दिली नाही तर घाबरून ताे साधक पटकन् परतेल, अशीच जास्त श्नयता आहे.