नालेसफाईचे प्रशासनाने नियाेजन करावे महापाैर शर्मिला पिंपळाेलकर यांचे निर्देश

    14-Apr-2026
Total Views |
 
 

nala 
 
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांचा प्रारंभ मुंब्रा परिसरातून करण्यात आला असून, संपूर्ण शहरातील नालेसफाईची कामे मे अखेरपर्यंत पूर्ण हाेतील या दृष्टीने प्रशासनाने नियाेजन करावे, अशा सूचना महापाैर शर्मिला पिंपळाेलकर यांनी दिल्या. दरवर्षी नालेसफाईला उशिरा सुरुवात हाेते; परंतु यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. मुंब्रा प्रभाग क्र. 32 मधील अमृतनगर येथील नाल्यापासून हे काम सुरू करण्यात आले. लवकरच शहरातील सर्व नाल्यांच्या सफाईला सुरुवात हाेणार आहे. नालेसफाईनंतर काढलेला गाळ तात्काळ उचलला जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही महापाैरांनी दिल्या. या प्रभागात स्वच्छता अभियानही राबवण्यात आले. परिसरातील रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले.
यावेळी ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. प्रत्येक प्रभागात स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षकांनी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवावे; तसेच उघड्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये, असे आवाहनही महापाैरांनी केले.