आपल्या दैनंदिन जीवनात आपण थाेडेफार मागेपुढे वाकताे पण देह एका बाजूला वाकवण्याची क्रिया जवळपास आपण करीतच नसताे. एका बाजूला वाकवण्याचे अनेक फायदे आहेत.मण्नयांना बांधून घेणाऱ्या पुढील व मागील बाजूंच्या स्नायूवरील ताण कमी करणे, बगलांपासून कमरेपर्यंच्या डाव्या व उजव्या बाजूंचे स्नायू याेग्य निगा राखून सुस्थितीत ठेवल्यास सर्व बाजूच्या स्नायूंवर शरीराचे वजन विभागले जाईल व संतुलन स्थापित हाेईल.सध्या बैठे काम, संगणकांचा वापर, दुचाकीवरून प्रवास यामुळे मानदुखी व पाठदुखी वाढली आहे. वेळीच काळजी घेणे उत्तम त्यासाठी हे चक्रासन.चक्रासनासाठी दाेन पायांत थाेडे अंतर ठेवून उभे राहावे. डावा हात काेपरात मुडपून हळूहळू सरळ वर करावा.
हात खांद्याच्या रेषेत सरळ वर झाल्यानंतर त्याला वरच्या दिशेने थाेडी ओढ द्यावी. यामुळे पावलांपासून हाताच्या बाेटांपर्यंत डावी बाजू पूर्ण ताणली जाईल. तळहात आतल्या बाजूने व बाेटे सरळ व एकमेकांना चिकटलेली असावीत.उजवा हात कंबरेवर ठेवावा.सुरुवातीला डाेके सरळ ठेवून कंबरेतून हळूहळू उजवीकडे वाकावे. हे वाकणे पुढच्या वा पाठीकडे अजिबात नसावे.कंबरेतून वाकल्यानंतर उजवीकडून डावीकडे हलकासा रेटा देऊन शेवटी हळूहळू आपले डाेके त्याच दिशेने वाकवून सैल साेडावे. स्थिती सुखद वाटत आहे, ताेपर्यंत मिळणाऱ्या सुखद ताणाची व श्वासाेच्छवासाची जाणीव घ्यावी. आसन साेडताना प्रथम हलकेच डाेके सरळ करून मग सावकाश कंबरेतून सरळ व्हावे. त्यानंतर डावा हात काेपरात दुमडून सावकाश खाली आणावा. सैल करावा. थाेडे थांबून मग उजव्या बाजूला करावे. सर्व्हायकल स्पाॅन्डिलायसिस, पाठदुखी तसेच बैठे काम करणाऱ्यांनी नियमित दाेनदा चक्रासनाचा सराव करावा.यामुळे सरळ बसण्याची व उभे राहण्याची सवय लागते.