गारे पालमा खाणीतून पहिली काेळसा रँक काेराडीत

    14-Apr-2026
Total Views |
 

coal 
 
राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या काेळसा खाणीमुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाेबत विजेचे दर कमी हाेऊन भविष्यातील ऊर्जेची गरज पूर्ण हाेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.महानिर्मितीच्या छत्तीसगडमधील गारे पालमा सेक्टर-2 काेळसा खाणीतून काेराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या काेळसा रेल्वे रँकचे आगमन झाले.मुख्यमंत्र्यांनी रँकला हिरवा झेंडा दाखवून काेळसा हाताळणी प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे अध्यक्ष राधाकृष्णन बी, संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक नितीन वाघ, गारे पालमा काेळसा खाणीचे मुख्य अभियंता शैलेश पडाेळे, काेराडी औष्णिक प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुदीप राणे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, गिरीश कुमार, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता, विनायक गर्गा आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
गारे पालमा या काेळसा खाणीतून अत्यंत उच्च दर्जाचा काेळसा उपलब्ध हाेत असल्यामुळे ऊर्जानिर्मितीची क्षमता वाढणार आहे. ऊर्जानिर्मितीसाठी असलेले अवलंबित्व त्यामुळे कमी हाेणार आहे; तसेच विजेचे दर कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. राज्यात लाेडशेडिंग राहणार नाही.महानिर्मितीला गारे पालमा ही काेळसा खाण आवंटीत झाली असून, 1583.487 हेक्टरमध्ये असलेल्या खाणीमुळे पुढील 77 वर्षे उच्च दर्जाचा काेळसा उपलब्ध हाेणार आहे. या खाणीतून 655.152 टन काेळसा उत्पादन हाेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.