मुंबई स्वच्छ दिसावी यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांच्या सहायक आयु्नतांनी नियमितपणे क्षेत्र भेटी द्याव्यात; तसेच स्वच्छता नीट हाेते की नाही हे पाहण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वाॅररूम) तयार करावा, असे निर्देश मुंबई महापालिका आयु्नत अश्विनी भिडे यांनी दिले. भिडे यांनी नुकतीच घनकचरा विभागाची आढावा बैठक घेतली.घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी उपायु्नत प्रशांत गायकवाड, उपायु्नत किरण दिघावकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.स्वच्छता ही नियमित प्रक्रिया आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता, महामार्गांवर सखाेल स्वच्छता व्हायला हवी. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते.
त्यामुळे या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र वाहने हवीत.या मार्गांवर स्वच्छतेसाठी आवश्यक असणारी विशेष वाहने तयार करण्यासाठी काही संस्थांची मदत घ्यावी. काही वर्दळीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम बनवावीत आणि तेथे तशीच स्वच्छता कायम राहील यासाठी नागरिकांना जागरूक करावे, असे भिडे यांनी सांगितले. स्वच्छतेप्रती नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग स्पर्धेत नागरिक; तसेच आस्थापनांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, कामकाज आदींबाबत दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. घरगुती कचरा संकलनासाठी महापालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आल्याचे दिघावकर यांनी सांगितले.