आपले पाय आपल्या संपूर्ण शरीराचा भार उचलत असतात. म्हणून त्यांची काळजी घ्यायला हवी. शिवाय पादत्राणांची निवड करताना काही गाेष्टी लक्षात घ्यायला हव्यात.पर्यटकांनाे, तुम्हाला माहीत आहे का, आपण आपल्या ज्या पायांच्या सहाय्याने संपूर्ण पृथ्वीला दाेनदा प्रदक्षिणा मारताे, दरराेज साधारण एक हजार वेळा वळताे, त्या पायांची काळजी चेहऱ्याच्या एक सप्तमांश तरी घेताे का? असं पायांकडे दुर्लक्ष का? माणसाची ओळख त्याच्या पादत्राणांवरूनच हाेते, असं पूर्वी म्हटलं जात असे. आज बाजारात तऱ्हेतऱ्हेच्या रंगीत फॅशनने भरलेल्या चामड्याच्या, कॅनव्हासच्या, सिंथेटिक चप्पल आहेत. साधारण प्रत्येक भारतीय केवळ 17 मिनिटांत हे ठरविताे की, पुढील सहा महिन्यांत माझ्या पायात काेणती पादत्राणं असतील.
एका ब्रिटीश कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुंदर दिसण्याची नैसर्गिक स्त्री लालसा लक्षात घेता, पन्नास टक्के शहरी महिला चप्पलेचं रूप आणि हिलची ऊंची बघून पहिल्या दृष्टीक्षेपात चप्पल घेण्याची चूक करतात.पादत्राणांची निवड करण्याच्या बाबतीत ऑिफसमधील लाेक आणि वृद्ध सगळ्यात जास्त सावधान असतात. सगळ्यात जास्त निष्काळजीपणा केला जाताे, मुलांच्या पादत्राणांची निवड करताना. माणसाच्या चेहऱ्याच्या भिन्नतेबराेबरच पाऊल आणि चाल यामध्येही फरक दिसून येताे. याचा परिणाम म्हणून चप्पलेचं साेल एका विशिष्टप्रकारे घासलं जातं. घासले गेलेल्या चप्पलच्या साेलचा अभ्यास करून न्यूयाॅर्कमधील बाॅब कराेडपती बनला.
माणसाचं पाऊल म्हणजे 26 छाेटी-माेठी हाडं, 20 हून पेशी, टेडन्स यापासून तयार झालेला एक विशिष्ट इंजिनीअरिंग प्लॅटाॅर्म आहे. यामध्ये वरील सर्व रचना मिसळून एक खास व्यवस्था निर्माण झाली आहे. यास आर्च असं म्हणतात. हा आर्चचं माणसाच्या विकसित पावलाची ओळख आहे.याद्वारेच पाेहणे, उडी मारणे, चढणे, धक्का सहन करणे यांसारखी कामं करता येतात. पायचं संपूर्ण शरीराच्या भाराला विशिष्ट भार वहन क्षेत्राच्या माध्यमातून आणि आर्चच्या मदतीने पृथ्वीपर्यंत पाेहचवताे. संशाेधकांच्या मते, आपले पाय आपल्या पूर्वजांच्या तुलनेत अधिक विकृत आहेत. पायाच्या या विकृतीला आर्च डिसऑर्डर या नावाने ओळखले जाते.
· टाचेजवळ याेग्य मापाची चप्पल, पंजापासून थाेडी दूर आणि सैल असते. यामुळे बाेटांना गती मिळते.
रूंद पाय असणाऱ्या लाेकांनी पुढे टाेक असणारी चप्पल कधीही खरेदी करू नये. चप्पलेची लांबी लक्षात घेणंही अतिशय महत्त्वाचं आहे.
· चप्पलेचं साेल खूप महत्त्वाचं असतं. साेल नेहमीच हलकं, लवचिक, मजबूत आणि रिजेस यु्नत असायला हवा. रिजेस घसरणं किंवा पडणे यापासून संरक्षण करतात. हिलची उंची एक इंचापेक्षा अधिक असता कामा नये. तसंच टाच टाेकदार नसून रूंद असायला हवी.