हाय ब्लडप्रेशर, काेलेस्ट्राॅल आणि हृदयाच्या आजारांपासून आपण वाचू इच्छित असाल, तर आहारात या फळे व भाज्या अवश्य सामील करा. यामुळे हार्टअॅटॅकचा धाेका कमी हाेत जाताे.आजकाल 35-40 च्या वयातच लाेकांना हाय ब्लडप्रेशर, हार्टच्या समस्या व स्ट्राेक सारखे आजार हाेऊ लागले आहेत. या सर्व आजारांचे माेठे कारण आपली लाइफस्टाइल आहे.खाण्या-पिण्याबाबत बेपर्वाई आणि त्यानंतर आराेग्याशी संबंधित समस्या सुरू हाेतात. अनेकदा याचे गंभीर परिणाम भाेगावे लागतात.
जर आपण जास्त असंतुलित खाणे खात असाल, तर यामुळे काेलेस्ट्राॅल वाढू लागताे. ज्यामुळे हार्ट अॅटॅकसारखा गंभीर आजार हाेऊ लागताे. शरीरात बॅड काेलेस्ट्राॅल साचू लागताे. ज्यामुळे हार्ट च्या समस्या वाढतात. तसे आपण खाण्यात काहही बदल करू या समस्या दूर करू शकता. हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी आपण आहारात खालील फळे, भाज्या व धान्ये सामील करू शकता.हार्टच्या पेशंटसाठी फळे सफरचंद आणि आंबट फळे :या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यात एक विशिष्ट विघळणारे फायबर आढळते. ज्याला पे्निटन म्हणतात. ही फळे आपण आपल्या राेजच्या आहारात सामील करावीत.
यामुळे काेलेस्ट्राॅल कमी हाेईल.
एव्हाेकाडाे : हे खाल्ल्यामुळे शरीरात बॅड काेलेस्ट्राल कमी हाेते आणि गुड काेलेस्ट्राॅल वाढते.एव्हाेकाडाेत माेनाेसॅचुरेटेड फॅट आणि फायबर असतात, ज्यामुळे काेलेस्ट्राॅल कमी हाेत जाताे.
बेरीज आणि द्राक्षे : काेलेस्ट्राॅल कमी करण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या बेरीजचा समावेश म्हणजेच स्ट्राॅबेरी, ब्ल्यूबेरी, रासबेरी आणि द्राक्षांचा खाण्यात समावेश करायला हवा. यात पॅ्निटन उत्तम प्रमाणात असते. ज्यामुळे काेलेस्ट्राॅल कमी हाेते व अत्यंत फायदेशीर असते.
हार्टसाठी भाज्या : बॅड काेलेस्ट्राॅल घटवण्यासाठी आपण नियमितपणे ताज्या भाज्या खाण्यात सामील करायला हव्यात. उदा.पालकात ल्यूटिन व कॅराेटेनाॅइड्स असते जे हृदयराेग कमी करते. टाेमॅटाे खाल्ल्यामुळे काेलेस्ट्राॅल कमी हाेते.रस हाय ब्लडप्रेशर कमी करताे.