स्वतःवर प्रेम करणे ही एक श्नितशाली आणि लाभदायी गाेष्ट आहे

    10-Apr-2026
Total Views |
 
 

hap 
 
या जगात आपण काेणती अत्यंत श्नितशाली अशी गाेष्ट करू शकताे किंवा काेणते काम करू शकताे, असा प्रश्न कधी काेणी विचारला, तर बराच विचार करावा लागेल. कारण हे उत्तर अजिबातच साेपे वाटणार नाही. काहीजण पुस्तक शाेधतील, काहींकडे गुगल किंवा इतरही अनेक पर्यायांचा विचार करतील.या प्रश्नाचे उत्तर सापडणे हे अवघड वाटण्याची दाेन कारणे आहेत. म्हणजे या प्रश्नाचे दाेन भाग आहेत, एक म्हणजे अत्यंत श्नितशाली गाेष्ट आणि दुसरी गाेष्ट म्हणजे आपण ती काेणती गाेष्ट करू शकताे.बराच विचार करूनही अनेकांना याचे उत्तर मिळेलच असेही नाही. काही उत्तरे मिळाली, तरीही ती कदाचित परिपूर्ण वाटणार नाहीत किंवा मग ती उत्तरे स्वीकारावीत, असेही वाटणार नाही.
 
काही अभ्यासकांना मात्र असे वाटते की, या प्रश्नाचे एक उत्तर आहे ते म्हणजे आपण करू शकताे, अशी अत्यंत श्नितशाली गाेष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. स्वतःवर प्रेम करणे ही एवढी श्नितशाली गाेष्ट आहे, ज्याची ताकद ही सहजासहजी माेजता येत नाही. स्वतःवर प्रेम केल्याने प्रत्येक गाेष्ट ही छान हाेऊ लागते, असा तर अनुभव अनेकांना येऊ लागताेकाही अभ्यासक अशा विषयावर बाेलताना लहान मुलांचे उदाहरण देतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, लहान मुलांना हे माहिती असते की, आपण स्वतःवर प्रेम कसे करायला हवे.हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी आपण हे आठवून पाहावे की, आपण जेव्हा लहान हाेताे, अगदी तान्हुले बाळ हाेताे, नुकतेच जन्माला आलाे हाेताे, तेव्हा प्रेम आणि उल्हासाने अगदी भरून राहिलाे हाेताे. स्वतःचाच द्वेष करते, असे एखादेमूल अगदीच अपवादाने, अगदी अभावानेच सापडू शकते. कारण स्वाभाविकपणे लहानपणी तसे घडतही नसते.
 
लहान मुले त्यांच्या भावना खुलेपणाने सांगतात आणि मांडतात. जेव्हा एखादे लहान मूल खूष हाेते, तेव्हा ते आपल्याला सहजपणे लक्षात येते, तर जेव्हा एखादे लहान मूल रागावलेले असते, तेव्हा तर अगदी शेजाऱ्यांनादेखील ते सहजगत्या समजते.कारण ते लहान मूल माेकळेपणाने व्य्नत हाेत असते. त्या लहान मुलाला काहीच लपवणे जमत नाही. त्या मुलांचे स्वतःवर प्रेम असते, स्वतः चाच आदर असताे आणि साेबतच त्यांच्यात भरपूर धाडस, साहस असते. त्यांच्यात एक प्रकारचा माेकळेपणा असताे.आपण स्वतःशीच हे कधीतरी आठवून पाहायला हवे की, आपणदेखील कधीतरी असेच साहसी हाेताे आणि प्रेमाने भरलेले हाेताे. तेच भाव स्वतःबद्दल जागृत करता आले, तर आपलेही आयुष्य असेच छान हाेऊ शकते. आपण स्वतःवर प्रेम करणे आणि त्या अपार श्नतीचा उपयाेग चांगल्या गाेष्टींच्या निर्मितीसाठी करणे हेदेखील शक्य हाेते. फ्नत आपल्याला स्वतःमधील ते मूल ओळखता आले पाहिजे.