राज्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामाेहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आराेग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या ‘माझं गाव आराेग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री यावेळी उपस्थित हाेते. आबिटकर यांनी अभियानाविषयी माहिती दिली. या अभियानाविषयी माहिती देणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना गाैरवण्यात येणार आहे.