ओशाे - गीता-दर्शन

    01-Apr-2026
Total Views |
 

osho 
 
सगळं ठीक आहे,’ पण...मग त्यांचा कमजाेर भाग पुढे येताे, साॅफ्ट काॅर्नर, साडी, ते त्यांचं वेड आहे, इनफॅच्युएशन. त्याचं कारण हे आहे, की पुरुषांनी जे जग बनवलं आहे, त्यात स्त्रियांना इतर व्य्नतींशी संबंध बनवायला अजिबातच मुभा ठेवलेली नाही, सगळे दरवाजे बंद! मग त्या वस्तूंशी संबंध घडवून आणतात. त्या वस्तूंच्या वेड्या हाेतात. पतीला शिक्षा झाली तरी हरकत नाही; पण बाईसाहेबांना हिऱ्याची अंगठी चुकता कामा नये.वस्तूंशी इतका खाेल संबंध त्याचं कारण तेच आहे. अन्य व्य्नतींशी संबंध ठेवण्याचा काहीच मार्ग नसल्याने त्यांची सारीच्या सारी चेतना वस्तूंशी संबंध निर्मित करण्याच्या मागे लागते.
 
अपरिग्रहाचा अर्थ आहे वस्तुंमध्ये रस नाही, त्या वस्तूंचं वेड नाही. वस्तू आहेत, त्यांचा उपयाेग करणं ठीक आहे. हिऱ्याची अंगठी असली तर घातली, नसली तर नाही. हिऱ्याची अंगठी असली तर ठीक. नसली तर ते नसणंही ठीक. दाेन्ही गाेष्टी सारख्याच हाेऊन जाव्यात, खेळण्यासारख्या. हिऱ्याची अंगठी असली तरी खेळणं, नसली तरी दुर्वाची-गवताची घालता येते. अन् तीही नाहीच मिळाली तर नुसती बाेटं आपापलं साैंदर्य व्य्नत करतातच ना! ज्यादिवशी चित्त वस्तूंविषयी इतकं सरळ हाेईल तेव्हा ते अपरिग्रही असेल. वस्तूंपासून पळपुटं नाही, तर त्यामध्ये जित-चित्त.