चाणक्यनीती

    01-Apr-2026
Total Views |
 

chankya 
 
स्वार्थासाठी धनाचा व्यय केल्यास व्यक्ती विलासी बनते, धनाची उधळ-माधळ, अपव्यय करते. चुकीच्या कामी (विनाकारण) धनाचा व्यय केल्याने धन नष्ट हाेत जाते. कर्ज काढून सण साजरे करण्याची वृत्ती वाढीला लागते. याउलट धन सत्कारणी लावल्याने म्हणजेच सत्पात्री दान दिल्याने समाधान  मिळते आणि अविरत परिश्रम करून दान देण्यासाठी धन संचित केले जाते व अशा तऱ्हेने दारिद्र्याचा नाश हाेताे. ‘दिल्याने मिळते’ हा सृष्टीचा नियम आहे. म्हणूनच म्हणतात, ‘दान दिये धन ना घटे’ किंवा ‘तू एक पैसा देगा, वाे दस लाख देगा.’ ताेंडचा घास अतिथीला दिल्यास शिव्या नव्हे, तर दुवाच मिळतात.आशीर्वादामागाेमाग समृद्धीही येते. सन्मित्र सुदाम्याचे प्रेमाने दिलेले मूठभर पाेहे खाऊन द्वारकाधीश श्रीकृष्णाने तृप्तीचा ढेकर दिला आणि त्याने दु:ख (दारिद्र्य), भाेग जाऊन त्याला ‘राजभाेग’ मिळाला.