जर आपण त्रस्त असाल तर नक्कीच काेणता ना काेणता शत्रू आपल्या विराेधात सक्रिय असेल. कमी वा जास्त शत्रू तर प्रत्येकालाच असतात. पण आयुष्यभर आपण काेणत्या शत्रूमुळे सर्वांत जास्त त्रस्त असताे याचा कधी विचार केला आहे का? नक्कीच आपल्या आत बसलेल्या शत्रूमुळे. ताे आपलाच एक भाग असताे. जेव्हा माणूस स्वत:चा शत्रू हाेताे तेव्हा त्याला कळतच नाही. नंतर याला स्वीकारणे खूप कठिण हाेते.रशियन लेखक व पेंटर मिखेल लेरमंतव ज्यांना पाेएट ऑफ काॅकेशसही म्हणतात सांगत असत- मी जेव्हा कधी काही चांगला विचार करताे तेव्हा माझ्यात तचवेळी काेणी ताे वाईट असल्याचा प्रयत्न करू लागताे.त्याचा प्रयत्न असताे की, मी माझी लेखणी वा कुंचला उचलूच नये. उचलला तरी तेच करीत राहावे जे आज पर्यंत करीत आलाे आहे. नवे नाही, कारण त्यात आव्हाने आणि अडचणी आहेत.
आता हे आपल्यावर असते की, काेणाचे म्हणणे ऐकावे? अडचण ही असते की आपण जाेपर्यंत विचाराच्या स्थितीत असताे ताेवर शत्रू जिवंत राहताे. आपण त्याला बाहेर करू शकत नाही. गरज असते त्याला साधण्याची. जमशेदजी टाटा जेव्हा टाटानंगरात आपल्या कंपनीची स्थापना करीत हाेते ेव्हा कित्येकदा ‘हाे-नाही’च्या स्थितीत पाेहाेचले. शत्रू नकाे म्हणत हाेता. त्यांनी सांगितले की मी ही विश्वास ठेवण्याची सवय लावून घेतली की माझ्यासाेबत जे व्हायचे आहे ते सर्वश्रेष्ठच व्हायचे आहे. यानंतर शत्रू गप्प झाला.आध्यात्मिक मार्गावर या शत्रूचा पराभव करण्याचा एक मार्ग सांगितला गेला आहे.संयमित राहा, संतुलनात राहा, नंतर आपण जे कराल ते चांगलेच हाेईल.’