हळदीचा उपयाेग कित्येक औषधे आणि घरगुती उपचारांत केला जाताे.हळदीमध्ये असे सर्व गुण सामावलेले आहेत जे मानव शरीराला स्वास्थ्य आणि सुदृढता प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. सर्दी-पडसे, घशामध्ये खवखव हाेणे, टाॅांन्सिलायटीस, कफविकार, त्वचाविकार, प्रमेह, कावीळ, यकृत दाेष, अतिसार, संग्रहणी तसेच नेत्रराेग दूर करण्यात हळदीचा उपयाेग औषधी रूपात केला जाताे. चेहऱ्याची त्वचा मुरूमे आणि डाग-धब्ब्यांनी कुरूप हाेते.एक चमचा वाटलेली हळद, दाेन चमचे बेसन, संत्र्याच्या सु्नया सालींची बारीक पावडर, अर्धा चमचा दूधाची मलई व थाेडे पाणी मिसळून दाट लेप बनवून चेहऱ्यावर लावावा. तसेच 10 मिनिटांनंतर, काेमट गरम पाण्याने चेहरा धुवावा. नियमित रूपात हा प्रयाेग करण्याने एक महिन्यात चेहऱ्याचे डाग - धब्बे दूर हाेतात.