ऑफिस, मग ते लहान असाे वा माेठे, काेणत्याही क्षेत्रातील असाे, तिथे एक गाेष्ट नेहमीच असते - ती म्हणजे मराजकारणफ. हे राजकारण कधी टीम मीटिंगमध्ये शिरते, कधी किरकाेळ चॅट्समध्ये असते, तर कधी संशयास्पद 40 मिनिटांच्या काॅफी ब्रेकच्या गप्पांमध्ये असते. बहुतेक सहकारी कर्मचारी असा आव आणतात की ते या सर्वांच्या पलीकडे आहेत. ‘मी ऑफिस पाॅलिटिक्सपासून दूर राहताे,’ असे ते माेठ्या अभिमानाने सांगतात, पण प्रत्यक्षात तुमच्यापैकी काेणीच यापासून पूर्णपणे वाचू शकत नाही. तुम्ही फक्त त्यात हुशारीने वागायला शिकू शकता.ऑफिसमधले राजकारण नेहमीच विषारी किंवा नुकसानकारक असते असे नाही; ताे केवळ एकाचा किंवा एका गटाचा प्रभाव, व्यक्तिमत्व आणि प्राधान्यक्रम यांचा संघर्ष असताे आणि प्रत्येकाची स्वतःला सिद्ध करायची धडपड. स्मार्ट कर्मचारी ताे ठरताे जाे यात न अडकता सतत स्वतःच्या अस्तित्वाविषयी जागृत राहताे.अनेक तज्ज्ञांनी सुचवलेले स्मार्ट राहण्याचे 5 मार्ग पुढील प्रमाणे आहेत:
1. अघाेषित नियम जाणून घ्या : प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक न छापलेले ‘मॅन्युअल’ असते जे तुमच्या जाॅइनिंग किटमध्ये नसते, परंतु कंपनी किंवा ऑफिसमधील निर्णय त्याचनुसार घेतले जातात.काेणाचे निर्णय खराेखर महत्त्वाचे असतात? काेणाची माती खराेखर विचारात घेतली जातात? ऑफिसमधील ती काेण व्यक्ती आहे जी शांत असली तरी तिचे मॅनेजमेंटमध्ये वजन आहे? ड्रेस डिझायनर अनिशा पाटील म्हणते, ‘पहिल्या ऑफिसमध्ये काम करत असताना मला वाटले हाेते की माझी चांगली कामगिरीच माझे माेठे काम करेल, परंतु तसे झाले नाही. संवादाच्या पद्धती वेळाेवेळी वापरणे आणि प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची माहिती असणे तितकेच महत्त्वाचे आहे. ही छुपी समीकरणे समजून घेणे म्हणजे राजकारण करणे नसून, पुढील वाटचालीसाठी जागरूक राहणे आहे.’
2. शांत राहा : आजच्या काळात जिथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याची गरज वाटते, तिथे शांत राहणे अधिक शक्तिशाली ठरू शकते. प्रत्येक संघर्षात पडण्याची किंवा काेणीतरी तुमचे श्रेय घेते म्हणून सतत स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. कधी, तुमचे कमी बाेलणे ही तुमचा ऑफिसमधील सन्मान वाढवते. केमिकल इंजिनिअर साेहम मेहता सांगताे की, ‘वरिष्ठ भांडत असताना तटस्थ राहिल्यामुळे दाेन्ही बाजूंनी त्याच्यावर विश्वास ठेवला.काेणाची बाजू घ्यायची, हे निश्चित नसल्याने, माेक्याच्या वेळी शांत राहणे ही तुमची भावनिक बुद्धिमत्ता दर्शवते.’ काेणाच्या वादात पडण्याचा तुमचा स्वभाव नाही तर तुम्ही त्या प्रसंगाच्या पुढेही पाहू शकता, हे तुमच्या शांत राहण्याने सिद्ध हाेते. कधी बाेलावेच लागेल आणि कधी शांत बसणे आवश्यक आहे, यावर तुमच्या विषयीचे मत ठरते.