छत्रपती संभाजीनगरची तहान भागवण्यासाठी नवीन पाणीपुरवठा याेजनेचे पाणी शहराकडे झेपावण्यास सुरुवात झाली असून, 2500 मि.मी. व्यासाच्या महाकाय जलवाहिनीत 4 किमी.पर्यंत पाणी घेण्यात आले. हे पाणी दाेन काेटी लिटर आहे.9 किमी. लांबीची जलवाहिनी शुद्ध करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.महापालिका आयु्नत जी. श्रीकांत यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जॅकवेलवर बसवण्यात आलेला 3700 अश्वश्नती पंप सुरू करण्यात आला. जायकवाडी धरणापासून पैठण साखर कारखान्यापर्यंत म्हणजेच 4 किमी.पर्यंत जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली. जलवाहिनीत घेतलेले पाणी स्काेअर व्हाॅल्व्हमधून बाहेर साेडण्यात आले हाेते. 4 किमी.पर्यंत जलवाहिनी पूर्णपणे भरल्यानंतर पंप बंद केला गेला. जलवाहिनीतील पाणी पुढे 9 किमी.पर्यंत नेले जाईल. तेथे स्काेअर व्हाॅल्व्हमधून हे पाणी बाहेर साेडण्यात येणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरण व जीव्हीपीआर कंपनीतर्फे देण्यात आली. ही जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण 38 किमी. जलवाहिनी अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने स्वच्छ केली जाईल. यासाठी किमान आठ दिवस लागतील. 14 एप्रिलपर्यंत नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी यावे या दृष्टीने नियाेजन करण्यात आल्याची माहिती आयु्नतांनी दिली.