या आठवड्यात तुमच्या जीवनात शिस्त व नियाेजनपूर्वक पद्धतीने काम करण्याची प्रवृत्ती वाढेल. तुम्ही तुमची कामे नेटकेपणाने पूर्ण रकराल. ज्याचे उत्तम परिणाम मिळतील. एखादे जुने काम पूर्ण करण्यात यश मिळेल. छाेट्या छाेट्या गाेष्टींचा जास्त विचार करणे टाळावे व सकारात्मक दृष्टिकाेन ठेवावा.
नाेकरी-व्यवसाय : कार्यक्षेत्रात या आठवड्यात तुम्ही केलेल्या कामाचे तुम्हाला चांगले फळ मिळेल. नाेकरदारांसाठी प्रगतीच्या संधी निर्माण हाेऊ शकतात. सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. व्यापार करणाऱ्यासाठी हा काळ उत्तम आहे पण काेणतीही गुंतवणूक याेजनापूर्वक करावी.
नातीगाेती : या आठवड्यात नात्यांमध्ये सामंजस्य व संतुलन राहील.त्यामुळे कुटुंबातील वातावरण सुखद आणि आनंददायी राहील. प्रेमसंबंधात माधुर्य टिकून राहील. सिंगल जातकांसाठी नव्या नात्याची सुरुवात हाेण्याची श्नयता आहे पण सावधानतेने पुढे जाण्याची गरज आहे.
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. पाेटासंबंधित समस्या वा गॅसचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे व खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात तसेच जास्त ताण घेऊ नये.नियमितपणे व्यायाम व याेग करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
शुभदिनांक : 29, 30, 03
शुभरंग : निळा, जांभळा
शुभवार : शुक्रवार, शनिवार
दक्षता: या आठवड्यात काेणत्याही प्रकारच्या चिंता व तणावाला आपल्यावर कुरघाेडी करू देऊ नये. अनावश्यक खर्च टाळावा.
उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाला दूर्वा वाहाव्यात व हिरवे मूग दान करावेत.