वृषभ

    29-Mar-2026
Total Views |

Horoscope 
या आठवड्यात तुमच्या जीवनात स्थैर्य व संतुलन असणार आहे. तुम्ही तुमची धैर्याने व हुशारीने पूर्ण कराल. ज्यामुळे उत्तम परिणाम मिळतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई करू नये. विचारपूर्वक पावले उचलावीत.
 
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुम्हाला तुम्ही केलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. नोकरदारांची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. सोबत नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. व्यापार करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल व लाभदायक आहे. पण भागीदारीत स्पष्टपणा राखायला हवा.
 
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा राहणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे संबंध मजबूत होतील. दांपत्यजीवनात सामंजस्य राहील. प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल. सिंगल जातकांसाठी नवे नाते सुरू होऊ शकते पण घाई करू नये.
 
■ आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. थोडासा थकवा वा आळस जाणवू शकतो. नियमित दिनचर्या व संतुलित आहार घ्यावा. घसा व सर्दी-पडशाचा त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानाकडे लक्ष ठेवावे. योग व ध्यान तुमच्यासाठी लाभदायक राहील.
 
■ शुभदिनांक : २९, ३०, ०३
 
■ शुभरंग निळा, जांभळा
 
■ शुभवार शुक्रवार, शनिवार
■ दक्षता या आठवड्यात पैशाबाबत बेपर्वाई करू नये. कागदपत्रे सही करण्यापूर्वी व्यवस्थित वाचून घ्यावीत.
 
■ उपाय : शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी. पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. गायीला ताजे गवत द्यावे. घरात साफसफाई व सुगंध राखावा.