भावंडांकडून मिळालेल्या आव्हानांमुळे धाकटी भावंडे यशस्वी

    29-Mar-2026
Total Views |
 

success 
 
मैदानावरील विशाल याेद्धा कुटुंबात सर्वात लहान अमेरिकन फुटबाॅलपटू आणि एनएफएल क्वार्टरबॅक ड्रेक मे मैदानावर एका विशाल याेद्ध्यासारखा दिसताे. 6 फूट 4 इंच उंची, रुंद, मजबूत खांदे आणि 102 किलाेग्रॅम वजनासह, ताे एका महान खेळाडूचे जिवंत प्रतीक आहे.पण जेव्हा ताे आपल्या कुटुंबासाेबत असताे, तेव्हा ताे स्वतः ला सर्वात लहान आणि सर्वात कमजाेर असल्याचे सांगताे.भावंडांचा प्रभाव ड्रेकचे माेठे भाऊ, ल्यूक आणि ब्यू हे 6 फूट 8 इंच उंचीचे बास्केटबाॅलपटू आहेत. त्याचा तिसरा भाऊ, काेल, 6 फूट 7 इंच उंचीचा बेसबाॅलपटू आहे. उंचीतही ड्रेक या भावंडांमध्ये सर्वात कमी आहे.क्रीडा शास्त्रज्ञांच्या मते, हा ‘लहानपणा’ हीच त्याची महाशक्ती आहे. यामुळे ते अधिक वेगवान बनतात.
 
यामुळे ते अधिक लवचिक बनतात. ड्रेकला लहानपणापासूनच माेठ्या आणि बलवान प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागला. या दबावामुळे ताे अधिक मजबूत झाला. क्रीडा विज्ञानात याला ‘लहान भावंडांचा प्रभाव’  म्हणतात.लहान भावंडांचे यशाचे प्रमाण जास्त संशाेधनातून दिसून आले की, लहान भावंडे अनेकदा खेळांमध्ये अधिक यशस्वी हाेतात. टाेराेंटाे विद्यापीठाचे क्रीडा शास्त्रज्ञ जाेसेफ बेकर यांनी 33 खेळांमधील 229 खेळाडूंवर केलेल्या संशाेधनातून असे दिसून आले की, लहान भावंडांचे यशाचे प्रमाण जास्त हाेते.कुटुंबातील वातावरणही महत्त्वाचे त्याचप्रमाणे, मार्क कार्टर यांनी इंग्लिश प्रीमियर लीगमधील आघाडीच्या 100 खेळाडूंच्या काैटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास केला. यांपैकी 81 खेळाडूंना माेठे भाऊ किंवा बहिण हाेते. त्यातील धाकट्या बहिण-भावाच्या यशाची संभावना दुप्पट हाेती. याचे कारण केवळ आनुवंशिकता नाही, तर कुटुंबातील सामाजिक वातावरणही यात भूमिका बजावते, असे तज्ज्ञ सांगतात.
 
माेठ्या भावंडांकडून मिळते प्रेरणा धाकटी भावंडे माेठ्या भावंडांकडून शिकतात, स्पर्धा करतात आणि स्वतःमध्ये सुधारणा करतात. चार भावंडांमध्ये सर्वात धाकटा असलेला टाॅम ब्रेडी, पाच भावंडांमध्ये चाैथा असलेला मायकल जाॅर्डन किंवा पाच बहिणींमध्ये सर्वात धाकटी असलेली सेरेना विल्यम्स यांची उदाहरणे आहेत.या सर्वांनी आपल्या माेठ्या भावंडांकडून प्रेरणा घेतली. त्यांच्याशी स्पर्धा केली. त्यामुळे त्यांना माेठे यश मिळाले.साैहार्दपूर्ण नात्यातील स्पर्धा फायदेशीर ‘सायकाॅलाॅजी ऑफ स्पाेर्ट्स अँड एक्सरसाइज’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भावंडांमधील स्पर्धा तेव्हाच फायदेशीर ठरते, जेव्हा त्यांच्यातील नातेसंबंध साैहार्दपूर्ण असतात. जर नातेसंबंध शत्रुत्वाचे असतील, तर आत्मविश्वास माेठ्या प्रमाणात कमी हाेऊ शकताे. जर माेठे भावंड पाठिंबा देणारे आणि स्पर्धात्मक दाेन्ही असेल, तर धाकटे मूल एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून उदयास येते.