या आठवड्यात तुमच्या जीवनात गहराई व गांभीर्य वाढेल. तुम्ही तुमची कामे पूर्ण समर्पणाने पूर्ण कराल. व दडलेल्या गाेष्टी जाणण्याची क्षमता वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमची हुशारी उपयाेगी पडेल. भावनेच्या भरात काेणतेही पाऊल उचलू नये व धैर्य टिकवून ठेवावे.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला तुम्ही केलेल्या कष्टाचे परिणाम पाहायला मिळतील. नाेकरदारांवर नव्या जबाबदाऱ्या साेपवल्या जातील. ज्यामुळे तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकाल.व्यापाऱ्यांसाठी काळ लाभदाययक आहे पण गुंतवणुकीपूर्वी सविस्तर माहिती घ्यायला हवी.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात. एखाद्या छाेट्या गाेष्टीवरून वाद हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे बाेलण्यावर ताबा ठेवावा. प्रेमसंबंधात ईमानदारी व विश्वास टिकवून ठेवणे गरजेचे ठरणार आहे. विवाहित जीवनात समजुतदारपणे वागायला हवे.
आराेग्य : आराेग्याबाबत हा आठवडा थाेडी दक्षता बाळगणचा संकेत देत आहे. तणाव व थकवा जाणवू शकताे. पाेट वा ब्लडप्रेशरशी संबंधित समस्या हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे नियमित तपासणी व याेग्य उपचार घ्यावेत.संतुलित आहार घ्यावा. याेग व ध्यानाने फायदा हाेईल.
शुभदिनांक : 31, 01, 04
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात रागात वा आवेशात काेणताही निर्णय घेऊ नये.
उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. व शेंदूर अर्पण करावा. गरीबांना लाल वस्त्र वा मसूर डाळ दान करावी.