या आठवड्यात तुमच्या जीवनात सामंजस्य व संतुलन राहील. तुम्ही तुमच्या कामात व नात्यांत उत्तम ताळमेळ टिकवून ठेवू शकाल. सामाजिक कार्यांत भाग घेण्याची संधीही तुम्हाला मिळेल. ज्यामुळे तुमचे संपर्क वाढतील. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुम्ही विवेक वापराल व इतरांचा सल्लाही घ्याल.
नाेकरी-व्यवसाय : कार्यक्षेत्रात या आठवड्यात तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. नाेकरदार जातकांना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्या भविष्यात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील. व्यापार करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल. नवे साैदे फायदा देऊ शकतात. भागीदारीत पारदर्शकता राखा.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य येईल. तुम्ही तुमच्या कुटुंब व मित्रांसाेबत उत्तम वेळ घालवण्याचा आनंद लुटू शकाल.जाेडीदारासाेबतच्या संबंधात अधिक बळकटी येईल. प्रेमसंबंधात राेमांन्स व समज वाढेल. या आठवड्यात कुटुंबीयांसाेबत धार्मिक प्रवासही करू शकता.
आराेग्य : आराेग्याबाबत हा आठवडा सामान्य स्वरुपाचे परिणाम देणारा असणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.त्वचेसंबंधित छाेट्या समस्या सतावू शकतात. त्यामुळे तुम्ही साफसफाईकडे विशेष लक्ष द्यायला हवे व उन्हापासून जपायला हवे. तसेच व्यायाम करावा.
शुभदिनांक : 29, 30, 03
शुभरंग : निळा, जांभळा
शुभवार : शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही वादापासून दूर राहावे. पैशाबाबत सावध राहावे. आर्थिक व्यवहारात काेणावरही विश्वास ठेवू नये.
उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी. शुभ्र वस्त्र धारण करावे. गरीबांना मिठाई वाटावी.