या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास व नेतृत्वक्षमता वाढेल. तुम्ही तुमची कामे उत्साहाने व जोमाने पूर्ण कराल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो व लोक तुमच्या विचारांमुळे प्रभावित होऊ शकतात. अहंकार टाळावा अन्यथा नात्यांत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची वाहवा होऊ शकते. नोकरदार व्यक्तींना बढती वा नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. नवे सौदे लाभदायक ठरू शकतात. पण कोणतीही मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये सकारात्मकता टिकून राहणार आहे. कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. दांपत्य जीवनात प्रेम व समजुतदारपणा वाढेल. प्रेमसंबंधाला बळकटी येईल. सिंगल जातकांसाठी नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
■ आरोग्य : आरोग्याबाबत हा आठवडा चांगला राहणार आहे. तुम्ही ऊर्जेने ओतप्रोत भरलेले राहणार आहत. पण अधिक कामामुळे तुम्हाला थकवा जाणवण्याचीही शक्यता आहे. तुम्ही कामाच्या व्यापातूनही पुरेशी विश्रांती घेण्याची गरज आहे. नियमित व्यायाम व संतुलित आहार गरजेचा आहे.
■ शुभदिनांक ३१, ०१, ०४
■ शुभरंग पिवळा, लाल, पांढरा
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता : या आठवड्यात अहंकार व राग टाळा. कोणत्याही वादात पडू नये.
■ उपाय : या आठवड्यात रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. गरीबांना गहू वा गूळ दान करावा. मंदिरात दिवा लावून आदित्य हृदय स्तोत्र वाचावे.