बदलत्या माेसमात लक्षात ठेवा या सहा गाेष्टी

    29-Mar-2026
Total Views |
 
 



Health
 
1. वेळेवर झाेपा व वेळेवर जागे व्हा माेसम बदलाने सर्वप्रथम आपले जैविक घड्याळ प्रभावित हाेते.दिवस छाेटा वा माेठा झाल्यामुळे मेलाटाेनिन आणि सेराेटाेनिनसारख्या हार्माेनच्या स्तरात बदल हाेताे. ज्यामुळे झाेपेची गुणवत्ता घटू शकते.जर्नल ऑफ ्निलनिककल स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अध्ययनानुसार, नियमित वेळी झाेपणाऱ्या-जागणाऱ्या लाेकांमध्ये माेसमी बदलादरम्यान निद्रानाश व थकव्याच्या तक्रारी कमी पाहिल्या गेल्या. यासाठी झाेपण्या-जागण्याची एक वेळ ठरवा. झाेपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा व रूमचे वातावरण आरामदायक बनवा. पुरेशी गाढ झाेप शरीराची प्रतिकारक्षमता मजबूत करते.
 
2. हायड्रेशनकडे लक्ष द्यायला हवे माेसम बदलताच बाॅडीत पाण्याचे संतुलन प्रभावित हाेते. हिवाळ्यात काेरडेपणा व उन्हाळ्यात डिहायड्रेशनकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जर्नल ऑफ टर्मेटाेलाॅजीत प्रकाशित एक अध्ययन सांगते की, पुरेसे पाणी पित राहिल्यामुहे त्वचेत आर्द्रता संतुलित राहते व संक्रमणाचा धाेका कमी हाेताे. विशेषकरून बदलत्या माेसमात आणि नंतर उन्हाळ्यातही शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा व डाेकेदुखी उद्भवते.
 
3. व्हिटॅमिन-सी युक्त आहार घ्या बदलत्या माेसमात शरीराला जादा पाेषणाची गरज असते.तापमानातील बदलामुळे फक्त संक्रमणाचा धाेकाच वाढत नाही तर एनर्जी लेव्हलही घसरू शकते. हाॅर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका रिपाेर्टनुसार व्हिटॅमिन सी, डी आणि झिंकयुक्त जेवण घेतल्यास माेसमी संक्रमणाची जाेखिम कमी हाेते. ताजी फळे, हिरव्या भाज्या व डाळी शरीराला आतून संतुलित ठेवते. या माेसमात गरम व ताजे अन्न जासत लाभदायक असते. संतुलित डाएट शरीराला पर्यावरणीय बदलानुसार राहण्यास मदत करते.
 
4. शारीरिक हालचाल चालू ठेवा लाेक थंडीत जिमला वा वाॅकिंगला जातात पण माेसम बदलताच ते साेडून देतात. खरे तर हीच वेळ जास्त सक्रिय राहण्याची असते. जागतिक आराेग्य संघटनेनुसार आठवड्यात किमान 150 मिनिटांचा मध्यम शारीरिक क्रिया इम्यून सिस्टीम सक्रिय ठेवते. आणि मूड उत्तम बनवते.ब्रिटिश जर्नल ऑफ स्पाेर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अध्ययनातही आढळले गेले आहे की, प्रत्येक माेसमात नियमित व्यायाम करणाऱ्या लाेकांमध्ये माेसमी नैराश्य व थकव्याची लक्षणे कमी आढळली.
 
5. नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवा माेसम बदलाचा परिणाम मानसिक स्थितीवर खूप जास्त पडताे.विशेषत: वसंतनंतर आणि तीव्र उन्हाळी सीझनमध्ये सीझनल अफे्निटव्ह डिसऑर्डरसारखीच नैराश्याची समस्या हाेऊ शकते. जरी ऊन थाेड थाेडे वाढत असले तरी नैसर्गिक प्रकाशात व वेळ घालवणे कमी करू नका.अमेरिकन सायकियार्टिक असाेसिएशननुसार नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवल्यामुळे मूड सुधारताे. साेबतच मेडिटेशनही करा. राेज 15-20 मिनिटांचे मेडिटेशन तणाव हार्माेन काेर्टिसाेल कमी करते.
 
6. सामाजिक संबंध टिकवून ठेवा मानसशास्त्रीय शाेध सांगतात की, जे लाेक बदल स्वीकारण्याची क्षमता ठेवतात ते तणावामुळे कमी प्रभावित हाेतात. 2021 मध्ये प्रकाशित एका सामाजिक अध्ययनात आढळले आहे की, कुटुंब व मित्रांशी नियमित संवाद मानसिक लवचिकता वाढवते. बदलत्या माेसमाकडे एक त्रास म्हणून नव्हे तर नव्या सुरुवातीच्या रुपात पहा. नवे कार्यक्रम अवलंबा, छंद जाेपासा. सामाजिक संबंध मजबूत करा.