मिथुन

    29-Mar-2026
Total Views |

Horoscope 
या आठवड्यात तुमच्या जीवनात चंचलता व नवी ऊर्जा राहील. तुम्ही नव्या गोष्टी शिकण्यास व करण्यास उत्साहित राहाल. तुमच्या विचारांमध्ये वेग येईल. ज्यामुळे तुम्ही एकावेळीच अनेक कामे करण्याचा प्रयत्न कराल. एकावेळी एका कामावर लक्ष देणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
 
■ नोकरी-व्यवसाय कार्यक्षेत्रात या आठवड्यात तुमच्या कौशल्य व बुद्धिमत्तेचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. नवे संपर्क बनू शकता जे भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरदारांसाठी प्रगतीच्या संधी चालून येऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी नेहमीपेक्षा चांगला काळ राहणार आहे. पण नवी गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात त्यामुळे आपल्या वागण्या- बोलण्यावर ताबा ठेवावा. प्रेमसंबंधात पाददर्शकता ठेवा. वैवाहिक जीवनात सामंजस्य राखण्यासाठी परस्परांच्या भावना समजायला हव्यात.
 
■ आरोग्य : या आठवड्यात आरोग्याबाबत तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. मानसिक ताण व थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी व झोपेविषयक समस्या होण्याची शक्यता आहे. नियमित योग, ध्यान आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. सोबत खाण्या-पिण्यातही संतुलन राखावे.
 
■ शुभदिनांक : २९, ३०, ०३
 
■ शुभरंग निळा, जांभळा
 
■ शुभवार शुक्रवार, शनिवार
 
■ दक्षता : चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात यासाठी इतरांचे ऐकून कोणतेही पाऊल उचलू नये.
 
■ उपाय : बुधवारी श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा. हिरवे कपडे घाला वा हिरव्या रंगाचा वापर करा. गरीबांना हिरवी भाजी दान करा.