महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना

    29-Mar-2026
Total Views |
 
 

fund 
 
राज्यातील दिव्यांग व्य्नतींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धाेरणात्मक निर्णय घेत महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी 20 काेटींची प्रारंभिक तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे दिव्यांगांच्या सर्वसमावेशक आणि परिणामकारक सक्षमीकरणाला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.हा निधी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक पाठबळ देणार आहे. या निधीच्या माध्यमातून नियमित याेजनांच्या चाैकटीत न बसणारे किंवा निधीअभावी अपूर्ण राहिलेले उपक्रम राबवण्यास प्राधान्य दिले जाईल. पुनर्वसन, राेजगार व उपजीविका, काैशल्य विकास, शिक्षण, आराेग्य सेवा, सहायक साधनांची उपलब्धता; तसेच समावेशक विकासावर लक्ष दिले जाईल.निधीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (दिव्यांग सक्षमीकरण) यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळात वित्त व नियाेजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत राहतील, तर आयु्नत, दिव्यांग सक्षमीकरण हे सदस्य-सचिव म्हणून निधीचे कार्यभार पाहतील, असेही मुंढे यांनी सांगितले.