इंधन तुटवड्याची अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल करणार: जिल्हाधिकारी डाॅ. आशिया

    29-Mar-2026
Total Views |
 
 

fuel 
 
पेट्राेल, डिझेल तसेच गॅसचा साठा मुबलक असतानाही तुटवडा असल्याचा खाेटा संदेश किंवा चुकीची माहिती समाज माध्यमांवर पसरवल्यास गुन्हा दाखल करून कठाेर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.इंधन तुटवडा निर्माण हाेणार असल्याच्या भीतीतून दाेन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील पेट्राेल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅस सिलिंडरसाठीही रांगा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डाॅ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पाेलीस अधीक्षक व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. जिल्ह्यात पेट्राेल, डिझेल वगॅसचा मुबलक साठा आहे.
वितरण व्यवस्थाही सुरळीत सुरू आहे.
 
समाज माध्यमांवर इंधन तुटवड्याची पसरवली जाणारी माहिती पूर्णपणे खाेटी आहे. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. पाेलिसांच्या सायबर सेलमार्फत समाज माध्यमांवर लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रमुख तेल कंपन्यांकडून इंधनाचा नियमित पुरवठा विनाअडथळा सुरू असल्याने तुटवड्याची काेणतीही शक्यता नाही. जिल्ह्यात काेणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसल्याने नागरिकांनी इंधनाची अनावश्यक साठेबाजी करू नये. अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण पेट्राेल पंपांवर रांगा लावणे टाळावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.