खाण्याचे पदार्थ ऑनलाइन माध्यमातून 24 तासांत कधीही मिळू लागले.त्यामुळे आपल्या खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का की अन्न तुमच्या दारापर्यंत 10 मिनिटांत कसे पाेहाेचते? न्यूट्रीबाइट वेलनेसचे सह-संस्थापक मनन वाेरा यांनी सांगितले की, केवळ अल्ट्रा-प्राेसेस्ड, प्री-कु्नड व फ्राेझन फूड आयटम वापरूनच इतक्या लवकर अन्न तयार करता येते. ते नंतर पुन्हा गरम करून ग्राहकांना दिले जाते. अशा अल्ट्रा-प्राेसेस्ड फूड आयटममुळे आराेग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण हाेऊ शकतात.यामुळे कार्डियाेवैस्कुलर राेगांची संभावना 10% ने वाढते. तसेच, देशातील तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 27.8% पर्यंत पाेहाेचले आहे, ज्याचे एक प्रमुख कारण ऑनलाइन अन्न संस्कृती असल्याचे मानले जाते. त्वरित डिलिव्हरी आराेग्यासाठी वाईट असल्याचे तज्ज्ञ सांगतात.फास्ट फूडच्या व्यसनामुळे गेला जीव आपल्या देशात आधीच खराब पाेषण, आराेग्यदृष्ट्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्या आहेत.
या दहा मिनिटांच्या अन्न वितरण सेवेमुळे ती आणखीच बिकट हाेत आहे. अलीकडेच, एक धक्कादायक प्रकरण समाेर आले आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने फास्ट फूडच्या व्यसनामुळे आपला जीव गमावला. तिच्या वैद्यकीय परीक्षणांमध्ये दिसून आले की, फास्ट फूडच्या सेवनामुळे तिचे आतडे एकमेकांत अडकले हाेते आणि त्यात छिद्रे निर्माण झाली हाेती.खरेदीला जाण्याची संस्कृती हाेऊ लागली कमी घरपाेच वस्तू मिळण्याच्या साेयीमुळे आपण खरेदीचा आनंदही गमावत आहाेत. याविषयी भाविका यांनी सांगितले की, माझ्या आईसाठी, किराणापासून सर्व वस्तूंची खरेदी हे फक्त एक काम नव्हते. तिच्यासाठी ती एक लहान सहल हाेती.त्यामुळे इतर लाेकांची भेट आणि बाेलणे व्हायचे.आता सर्व अॅपवर मिळू लागल्याने तिची तक्रारपण आहे. तिला वाटते की, बाजारात वस्तू घेताना जवळपासचे लाेक भेटायचे. त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. त्यातून सामाजिक संवाद असायचा.लाेक एकमेकाना सुख-दुःखात साथ द्यायचे.
दाेन-चार शब्द आपुलकीची व्हायचे. त्यामुळे एकाकीपणा दूर व्हायचा. आता, तंत्रज्ञानामुळे मानवी संपर्क कमी झाला आहे.ऑनलाइन फूडमुळे लठ्ठपणा, डायबिटीजमध्ये वाढ गेल्या वर्षी प्लस वन जर्नलमध्ये एक पाहणी अहवालात लिहिले हाेते की, ज्या भागात ऑनलाइन फूड आउटलेट्सची जास्त उपलब्धता आहे, तिथे लाेकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त दिसते. कारण ऑनलाइन दुकानांमुळे कॅलरीयुक्त प्राेसेस्ड फूड खाण्याकडे लाेकांचा कल वाढताे.त्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयराेग हाेण्याची शक्यता जास्त आहे. घरी जास्त वेळ घालवल्यावर माणूस भूक लागली नसतानाही खाताे. अशा बिंज इटिंगचे प्रमाणही वाढते. तेच डायबिटीज, हायपरटेंशनचे कारण बनत आहे.लाेकांनी गजबजलेली दुकाने पडू लागली ओस याविषयी दुकानदार मनाेज भाई यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबांचे गेल्या 50 वर्षांपासून दुकान आहे. पूर्वी लाेक दुकानात येऊन गप्पा मारायचे.लाेक एकमेकांना भेटायचे. आता मात्र लाेकांचे येणे कमी झाले आहे. आम्हीही हाेम डिलिव्हरी करायला सुरुवात केली. पण, 10 मिनिटांत वस्तू पाेहाेचवणे आमच्या हातात नाही.