आपली पृथ्वी सुस्थितीत असण्यासाठी पहिल्यांदा आपला देश सुस्थितीत असणे आवश्यक असते. आपला देश सुस्थितीत असण्यासाठी आपले कुटुंब सुस्थितीत असणे गरजेचे असते. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांमधील एकाेपा, समंजसपणा, प्रेमभावना, संस्कार, एकी या सगळ्या गाेष्टी महत्त्वाच्या ठरतात.कुठल्या कुटुंबात जन्म घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकत नाही. देवाची देणगी म्हणून तुम्ही त्या कुटुंबात जन्मलेला असता.रक्ताच्या नात्यामुळे कुटुंब एकत्र रहात नाही तर परस्परांविषयीचा आदर आणि दुसऱ्याला आनंद देण्याच्या वृत्तीतून कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र राहतात. कुटुंब म्हणजे कुणालाही वगळायचे नाही आणि कुणालाही विसरायचे नाही. संपत्ती आणि अधिकारांपेक्षा कुटुंबाचे प्रेम आणि त्यांच्याकडून हाेणारे काैतुक, मिळणारी दाद अधिक महत्त्वाची असते.
घटक म्हणजे कुटुंब तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या शाेधात घराबाहेर पडता आणि जेव्हा ते तुम्हांला गवसते तेव्हा कुटुंबियांसमवेत शेअर करण्यासाठी तुम्ही परत येता. कुटुंबाचा विस्तार केव्हा करायचा आणि कुटुंबाला कशा प्रकारे पाठबळ द्यायचे याचे नियाेजन स्त्री करू शकते. संध्याकाळी निवाऱ्यासाठी घर असणे आणि घरी आपल्यासाठी कुणीतरी वाट पाहणारे असणे म्हणजे कुटुंब. या दाेन्ही गाेष्टी असणे म्हणजे दुग्धशर्करा याेग.कुटुंब हे हाेकायंत्राप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत असते. प्रगतीची नवी उंची गाठण्यासाठीची प्रेरणा कुटुंबाकडूनच मिळते आणि अपयश येते तेव्हाही कुटुंबाचाच आधार असताे. कुटुंबातील आपल्या आयुष्यातील माेल प्रत्येकाने समजावून घेतले पाहिजे. कुटुंबातील सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांची काळजी घ्या आणि नाती अधिक घट्ट करा.