राज्यात प्राथमिक आराेग्य सुविधांपासून संदर्भीय सेवेपर्यंत आराेग्य व्यवस्था कार्यरत आहे. ही व्यवस्था अधिक सक्षम, बळकट करण्यासाठी शासन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहे. जागतिक दर्जाच्या आराेग्य सुविधा असलेला संपन्न महाराष्ट्र निर्माण करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत करत आराेग्य, औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांनी शासनासाेबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.पल्स-2026 वैद्यकीय परिषदेच्या निमित्ताने यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फाेरमच्या वतीने विविध औषध निर्माण, आराेग्य क्षेत्रातील कंपन्यांसाेबत ‘भारतासाठी भविष्य-सज्ज आराेग्यसेवा आणि काैशल्य विकास परिसंस्था’ या विषयावर आयाेजित चर्चे प्रसंगी मुख्यमंत्री बाेलत हाेते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयु्नत अनिल भंडारी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित हाेते.विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालकांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी शंकानिरसन केले.बऱ्याच क्षेत्रांत देशात महाराष्ट्राने ग्लाेबल कॅपॅबिलिटी सेंटरची क्षमता निर्माण केली आहे. आता औषध निर्माण क्षेत्रातही ग्लाेबल कॅपॅबिलिटी सेंटर निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.ताणतणाव आणि या धकाधकीच्या जीवनात मानसिक आराेग्य महत्त्वाचे झाले आहे. मानसिक आराेग्याच्या उपचार सुविधा राज्यात निर्माण करण्यासाठी शासन काम करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.