या आठवड्यात तुमच्या जीवनात जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो पण तुम्ही तुमच्या मेहनत व धैर्याने सारी कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील. तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या दिशेने ठामपणे जाल. कुटुंबाची मदत मिळेल व घरातील वातावरण सामान्य राहील.
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सकारात्मक बदल होतील तसेच तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य लाभेल. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल आहे. पण कोणत्याही प्रकारची नवी गुंतवणूक कऱ्यापूर्वी पूर्ण योजना बनवणे आवश्यक आहे.
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य टिकून राहील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची मदत मिळेल. प्रेमसंबधात स्थिरता येईल. सिंगल जातकांसाठी नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण हळू हळू पुढे जाणे उत्तम ठरेल. मुलांकडून शुभवार्त समजेल..
■ आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. कामाच्या प्रेशरमुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. हाडे वा सांध्यांसंबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. योग्य व्यायाम करावा. सकाळी फिरायला जावे. तसेच पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्यावा. तेलतिखट कमी सेवन करावे.
■ शुभदिनांक : २९, ३०, ०३
■ शुभरंग निळा, जांभळा
■ शुभवार शुक्रवार, शनिवार
■ दक्षता या आठवड्यात कोणत्याही प्रकारची बेपर्वाई टाळावी. अनावश्यक खर्च टाळावा.
■ उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी व सरसू तेलाचा दिवा लावावा.गरीबांना काळे तीळ व कांबळे दान करावे. पिंपळाखाली दिवा लावणे शुभ.