कर्क

    29-Mar-2026
Total Views |
 
Horoscope
या आठवड्यात तुमच्या जीवनात भावननिक संतुलन टिकून राहणे आवश्यक असेल. कुटुंब व घरासंबंधित गोष्टींकडे तुमचे जास्त लक्ष राहील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे पसंत कराल.
 
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. नोकरदारांसाठी हा आठवडा स्थैर्य घेऊन आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होईल. व्यापारी वर्गासाठी नव्या संधी येऊ शकतात पण कोणताही निर्णय भावुकतेने घेऊ नये...
 
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य वाढेल. जर मतभेद वा वादाचे प्रसंग आले तर मोकळेपणाने बोलून ते दूर करता येतील. प्रेमींना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. ज्यामुळे आपसात समज वाढेल. विवाहित जातकांमध्ये सुख व सामंजस्य राहील.
 
आरोग्य : या आठवड्यात तुम्ही तुमचे आरोग्य सामान्य राहणार आहे. कामाच्या धावपळीमुळे तुम्हाला थोडासा थकवा व तणाव जाणवू शकतो. नियमित व्यायाम, झोप आणि संतुलित आहार आवश्यक आहे. खाण्या- पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करावे.
 
■ शुभदिनांक : ३१,०१, ०४
 
शुभरंग पिवळा, लाल, पांढरा
 
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
 
■ दक्षता या आठवड्यात मोठे निर्णय सावधानतेने घ्यावेत. पैशासंबंधित फसवणुकीपासून जपावे.
 
■ उपाय : मंगळवारी लाल फुले वा लाल कापड दान करावे. रोज सूर्योदयाच्या वेळी थोडासा व्यायाम व प्राणायाम करावा. श्रीगणेश वा देवदेवींची पूजा करावी व दिवा लावावा.