या आठवड्यात तुमच्या जीवनात उत्साह राहील. नव्या योजनांची सुरुवात होऊ शकते व जुन्या रखडलेल्या कामात प्रगती दिसेल. तुमची नेतृत्वक्षमता समोर येईल. ज्यामुळे टीम व सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. गुंतवणूक विचारपूर्वक करावी. घाईत निर्णय घेऊ नये व रागावर ताबा ठेवावा. वाद टाळावेत.
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात चढ- उतार पाहायला मिळू शकतात काही नव्या संधी समोर येतील. पण त्या ओळखताना व निवडताना सावध राहायला हवे. जर एखादेनवे प्रोजेक्ट वा उद्योगयोजना बनवत असाल तर त्याचे व्यवस्थित विश्लेषण करन घ्यावे.
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य वाढेल. जर मतभेद वा वादाचा प्रसंग आला तर मोकळेपणाने संवाद साधल्यास ते मिटू शकतील. प्रेमी जोडप्याला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. विवाहित जातकांमध्ये घरगुती सुख सामंजस्य वाढू शकते.
■ आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. किंचित थकवा वा तणाव जाणवू शकतो. विशेषतः कामाच्या व्यापामुळे नियमित व्यायाम, पुरेशी झोप व संतुलित आहार आवश्यक आहे. पचनासंबंधित समस्या होण्याची शक्यता असल्यामुळे खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
■ शुभदिनांक : ३१, ०१, ०४
■ शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता या आठवड्यात मोठे निर्णय दक्षतेने घ्यावेत. पैशासंबंधित फसवणुकीपासून जपावे.
■ उपाय : मंगळवारी लाल फुले वा लाल कापड दान करावे. रोज सूर्योदयाच्या वेळी थोडासा व्यायाम व प्राणायाम करावा. श्रीगणेश वा देवदेवींची पूजा करावी व दिवा लावावा.