या आठवड्यात तुमच्या जीवनात तुम्हाला नव्या विचार व बदलाचे संकेत मिळतील. तुम्ही थाेडे वेगळे व रचनात्मक करण्याचा विचार करू शकता. सामाजिक क्षेत्रात तुमची सक्रियता वाढेल व नव्या लाेकांना भेटण्याची संधी मिळेल. एखादा जुना मित्रही भेटण्याची श्नयता आहे.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुम्हाला नव्या संधी शकताता. नाेकरदार व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल राहील. त्यांच्या कार्यशैलीची वाहवा हाेईल. व्यापार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. पण काेणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत पूर्ण माहिती मिळवावी.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात जिव्हाळा राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंब व जीवनसाथीसाेबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल.प्रेमसंबंधात सामंजस्य व विश्वास वाढेल. सिंगल जातकांसाठी नव्या नात्याची सुरुवात हाेण्याची श्नयता आहे.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहणार आहे. कामाच्या तणावामुळे तुम्हाला थकवा व मानसिक ताण राहू शकताे. ताे टाळण्यासाठी तुम्ही घ्यान व याेग करायला हवे. कमी झाेपेमुळेही थकवा जाणवू शकताे. ताे घालवण्यासाठी पुरेशी झाेप घ्यायला हवी.
शुभदिनांक : 29, 30, 03
शुभरंग : निळा, जांभळा
शुभवार : शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे. पैशाबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिदेवाची पूजा करावी व काळे तीळ दान करावेत. पिंपळाखाली दिवा लावावा.