कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जाे जाे रे... असे पाळण्याचे मंगल स्वर पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग राम मंदिरात निनादले.
मंदिरात श्रीरामजन्म साेहळ्यात झालेली फुलांची उधळण... रांगाेळीच्या पायघड्या आणि दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पाळणा हलताच श्रीराम नामाच्या झालेल्या एकत्रित जयघाेष वातावरण राममय झाले.श्री रामजी संस्थान तुळशीबागेच्या वतीने श्रीराम जन्माेत्सवानिमित्त तुळशीबाग राम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. उत्सवाचे यंदा 265वे वर्ष हाेते.
संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डाॅ. रामचंद्र तुळशीबागवाले; तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि काेटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयाेजन केले हाेते. यंदा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंदिरात दर्शनासाठी आले हाेते.मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. सकाळी 11 वाजता श्रीरामाच्या पाेषाखाची मिरवणूक काढण्यात आली. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. श्रीराम जन्मानंतर मिळणारा श्रीरामाच्या वस्त्राचा पागाेट्याचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती. सायंकाळी श्रीरामाच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली.