जपानच्या इचिकावा प्राणीसंग्रहालयात आईने साेडून दिलेल्या पंच नावाच्या माकडाच्या पिल्लाने साेशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या ओरँगटाऊनच्या मऊ खेळण्यासाेबत वेळ घालवताना पूर्णपणे एकटे असलेल्या पंच नावाच्या माकडाच्या पिल्लाने जगभरातील लाेकांची मने जिंकली हाेती.मात्र, आता बेबी पंचला एका माकडाची खूप आवड निर्माण झाली आहे. ताे एका माकडीणीसाेबत खेळताना, उड्या मारताना, तिला मिठी मारताना आणि तिच्याशी चाळे करताना दिसत आहे, त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील लाेकांनी तिला ‘पंचची गर्लफ्रेंड’ म्हणायला सुरुवात केली आहे.