पनवेलकरांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शाेधण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठाेस पावले उचलली असून, देहरंग धरणावर आधारित वाढीव पाणीपुरवठा याेजनेला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. शहराच्या वाढत्या लाेकसंख्येचा विचार करून दीर्घकालीन नियाेजनाला सुरुवात करण्यात आली असून, यासाठी 115 काेटींच्या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.पनवेल महापालिकेने पाणी संकटावर मात करण्यासाठी देहरंग धरणातून वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी याेजनेला गती दिली आहे. महापालिका आयु्नत मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या याेजनेचे काम पुढे सरकत असून, महापालिकेचे अतिर्नित आयु्नत गणेश शेटे यांनी यासाठी सुमारे 115 काेटी 48 लाखांच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध केली.देहरंग धरणाची क्षमता 3.125 घनलक्ष मीटर असून, सध्या राेज सुमारे 16 दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवठा केला जाताे.
मात्र, सध्याच्या 550 मिमी. व्यासाच्या जीर्ण जलवाहिनीमुळे पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे नवीन प्रस्तावानुसार 1100 मि.मी.
व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून, देहरंग ते पनवेलदरम्यान सुमारे 16.5 किमी. अंतरावर ही व्यवस्था उभारली जाणार आहे. धरणाजवळ 70 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि 9.40 एमएलडी क्षमतेची साठवण टाकी उभारली जाणार आहे.
पावसाळ्यात धरणातून वाहून जाणारे पाणी वापरून नवीन पनवेल, कळंबाेली व कामाेठे या सिडकाे वसाहतींची तहान भागवण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला हाेता. या आराखड्याला नगर संचालनालयाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. मात्र, मंजुरीच्या प्रतीक्षेत न राहता महापालिका आयु्नतांनी संबंधित याेजनेच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन जलयाेजनेमुळे अतिर्नित पाणी साठवून ते शहराला पुरवण्याचे नियाेजन केले आहे.भविष्यात शिलार धरणातून जलबाेगद्याद्वारे पाणी देहरंग धरणात आणण्याची याेजनाही विचाराधीन असल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विलास चव्हाण यांनी दिली.