तसं मनाेवेत्ते तर सांगतातच की फळा असताेच मुळी यासाठी की अधून मधून शिक्षकानं मुलांच्याकडे पाठ फिरवली पाहिजे, नाहीतर सहा-सात तास जर त्यानं आपली पाठ मुलांपासून दुसरीकडे वळवलीच नाही तर मुलांचा इतका काेंडमारा हाेईल. की ती आजारीच पडतील. तेव्हा थाेडीतरी माेकळीक पाहिजेच. त्यांच्याकडे पाठ फिरवून त्याने फळ्यावर काही लिहायला सुरवात केली की ताेंड विचकणे, थट्टा मस्करी, ध्नकाबु्नकी सगळं लिहायला सुरुवात केली की ताेंड वळवलं की पुन्हा शिकायला सुरुवात हाेते. तेव्हा फळा तसा मुलांच्या फारच उपयाेगी असताे. त्याच्यामुळे शिक्षकाला अधूनमधून मागे बघावे लागते. पण ही जिवंत मुले आहेत. यांच्यावर मालकी? छाेट्यांवर मालकी करणं फार अवघड आहे.
आईबापही आपल्या छाेट्यांना थाेडी-थाेडी भुरळ पाडतातच, लाच देतात. मुलांच्या आवडीची लाच असते- चाॅकलेट, टाॅफी. वडील घरी परतताना तर विचार करतात. ‘आज काय लाच घरी घेऊन जावी बरं.’ दारात उभा असणारच हा टीचभर मुलगा, ज्याला जीवनातली काेणतीच ताकद अजून आलेली नाही, काही नाही, त्यालासुद्धा घरी परतताना वडील घाबरतात. आई-बापांवर आपल्या छाेट्या-छाेट्या मुलांना सुद्धा खाेटं सांगायची पाळी येते.सिनेमाला जायचं असेल तर गीता-ज्ञान सत्राला चाललाेत असं ते सांगतात.व्य्नतीशी संबंध ही फार गुंताड्याची गाेष्ट आहे.छाेटीशी जिवंत व्य्नती, अन् गुंताडा चालू हाेताे. मग आपण व्य्नतींना बाजूला सारायला लागताे की, ‘माणसं हटवा, वस्तू वाढवा.’ घरात जा, कुठंही नजर टाका.आपणच मालक असता.