मुंबई मेट्राे मार्ग 11 प्रकल्पासाठी 5500 काेटींचे जपानी अधिकृत विकास साह्य (ओडीए) कर्ज देण्यासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) केंद्र सरकारसाेबत कर्ज करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पात 14 स्थानकांसह अंदाजे 17.51 किमी. मेट्राे मार्गांचा समावेश आहे.त्यातून मुंबई पाेर्ट वाॅटरफ्रंट आणि मुंबईला जाेडणारा मार्ग तयार करून मुंबई ट्रान्सहार्बर लिंकपर्यंत (एमटीएचएल)त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे.मेट्राे 11 प्रकल्पासाठी मुंबई मेट्राे रेल काॅर्पाेरेशन लिमिटेड (एमएमआरसी) काम करेल. हा प्रकल्प ऑगस्ट 2032 पर्यंत पूर्ण हाेणार आहे. भूमिगत विभागातील बांधकामाची प्रारंभिक खरेदी पॅकेजसाठीच्या निविदेची घाेषणा सप्टेंबरमध्ये हाेईल.
मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतुकीची मागणी, माेठ्या प्रमाणात जलद वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करून पूर्ण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.शहरी वातावरणात सुधारणा हाेईल आणि वाहतूक काेंडी कमी हाेईल, असा विश्वास प्रशासनाने व्य्नत केला आहे.ेट्राे 11 (ग्रीन लाइन) ही दक्षिण मुंबईतील काेंडी कमी करण्यासाठी आखलेली, भूमिगत असलेली सुमारे 1718 किमी. लांबीची मार्गिका आहे. ही मार्गिका वडाळा (आणिक डेपाे) ते गेट वे ऑफ इंडिया यांना जाेडणार आहे.