दु:खवेदनांची जाणीव डाॅगीची साेबत बदलते

    28-Mar-2026
Total Views |
 
 

dog 
 
वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी वेदनाशामक गाेळी खात असाल तर जरा थांबा.प्रथम थाेडा वेळ डाॅगीसाेबत घालवून पाहा.कदाचित तुम्हाला औषधाची गरजच पडणार नाही. अलीकडेच झालेल्या दाेन अध्ययनात हे सांगितले आहे.माराच्या स्थितीत मेंदू वेदनेद्वारे त्वरित प्रतिक्रिया देते. आणि दुसऱ्या प्रतिक्रियांप्रमाणेच वेदनेच्या प्रतिक्रियतेवरही अनेक गाेष्टींचा परिणाम हाेताे. शाेध सांगतात की, कुटुंब, शेजारीपाजारी व मित्रांकडून मिळणारी मदत आपली वेदनेची जाणीव कमी करते. पण बऱ्याचशा कुटुंबात पाळीव प्राण्यांनाही कुटुंबाचा भाग मानतात.याच वेळी बर्लिनच्या संशाेघकांनी पाळीव डाॅगी व वेदनेच्या प्रतिक्रियेचा परिणाम जाणण्यासाठी124 सुदृढ महिलांवर अध्ययन केले.वेदनेची प्रतिक्रिया जाणण्यासाठी महिलांचा हात थंड पाण्यात घातला गेला.
 
पहिल्या अध्ययनात फक्त त्यांना सामील करण्यात आले ज्यांच्याकडे पाळीव डाॅगी हाेते.एका स्थितीत महिलांना काेल्ड प्रेसर टेस्ट एकटी घेण्यासाठी सांगितले गेले. दुसऱ्या टेस्टमध्ये रूममध्ये दाेस्त व तिसऱ्या टेस्टमध्ये पाळीव कुत्रा ठेवला गेला. अध्ययनात आढळून आले की, दाेस्ताची उपस्थिती वेदनेची जाणीव कमी करते.पण पाळीव डाॅगी आजूबाजूला असणे अधिक उत्तम असते. त्यांना वेदना कमी झाल्या व चेहऱ्याचे हावभाव संयमित राहिले. साेबतच महिला काेल्ड प्रेसर टेस्ट उशिरपर्यंत सहन करू शकल्या.
याचप्रमाणे दुसऱ्या अध्ययनात ज्या उमेदवारांचा अपरिचित डाॅगींविषयी उत्तम दृष्टिकाेन हाेता त्यांना इतरांच्या तुलनेत वेदनेची जाणीव कमी झाली. संशाेधकांनुसार याचे कारण आपल्यांच्या उपस्थितीत तयार हाेणारे ऑ्नसीटाेसिन हार्माेन आहे जे आपले साेबत असल्यास उत्तम परिणामांचे कारण हे आहे की डाॅगी आपल्या संबंधात आपल्या प्रतिक्रियांबाबत काेणतेही मत बनवत नाहीत.