व्यसनमु्नत समाज निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे; नार्वेकर यांचे प्रतिपादन

    28-Mar-2026
Total Views |
 
 

Addiction 
 
व्यसनमु्नत समाज घडवण्यासाठी शासनाबराेबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाज घटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागातर्फे 2020 ते 2025 या पाच वर्षांतील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमु्नती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमात नार्वेकर बाेलत हाेते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे; तसेच विभागाच्या आयु्नत दीपा मुधाेळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित हाेते. व्य्नितगत पुरस्कार 15 हजार सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तसेच संस्था पुरस्कार 30 हजार रुपये, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप हाेते. एकूण 100 व्य्नती व 13 संस्थांना पुरस्कार देण्यात आले. व्यसनमु्नती क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र, या क्षेत्रात कार्य करणारे लाेक समाजासाठी आशेचा किरण आहेत. पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल आहे, असे शिरसाट यांनी सांगितले. नागरिकांनी व्यसनमु्नत जीवन जगावे, असे आवाहन आठवले यांनी केले.