बराेबर 42 वर्षांपूर्वी याच कार्यक्रमात मी गाण्यासाठी बसलाे हाेताे. काका गाेडसे यांनी माझा पहिला कार्यक्रम आयाेजित केला हाेता. त्यावेळी फ्नत एक तबलावादक आणि मी, असेच सादरीकरण असायचे. कार्यक्रम रात्री दहाला सुरू हाेऊन पहाटे चार-पाचपर्यंत रंगायचा. आज मी प्रकृतीने खूप अस्वस्थ आहे; मात्र दगडूशेठ गणपतीचा कार्यक्रम असल्यामुळेच मी येथे आलाे आहे, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्य्नत केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणपती मंदिराच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून संगीत महाेत्सवाचे आयाेजिण्यात आला हाेता. पं.
मंगेशकर यांच्या भावसरगमने महाेत्सवाची सांगता झाली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
पं. मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि लता मंगेशकर यांनी अजरामर केलेले ‘श्री रामचंद्र कृपालु भज मन’ हे स्तवन गायिका प्राची यांनी सादर केले. त्यानंतर विभावरी आपटे-जाेशी यांनी गजानना श्री गणराया आधी बंधू तुज माेरया... तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ‘हे हिंदू नृसिंहा प्रभाे शिवाजी राजा’ ही गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. रात्रीस खेळ चाले, ही वाट दूर जाते, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, जांभुळ पिकल्या झाडाखाली... ही पं. मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांनी अजरामर केलेली गीते कलाकारांनी सादर केली.