राखावी बहुतांची अंतरे । भाग्य येते तदनंतरे ।1।

    26-Mar-2026
Total Views |
 

saint 
सर्व लाेकांमध्ये आपल्यासंबंधी सद्भावना व आदर निर्माण झाल्याशिवाय आपल्याला कदापिही माेठेपणा प्राप्त हाेत नाही. हा आदर आपण आपल्या वागण्यानेच उत्पन्न करू शकताे व त्यामुळेच समाजाचे पुढारीपण मि ळते. लाेकांना राजी राखून, आपलेसे करून घेण्यावर श्रीसम र्थांचा भर आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापनेसाठी अगदी सामान्यातल्या सामान्य कुणबी, मावळे, बलुतेदार यांनाही आपल्या उत्तम नेतृत्व गुणांमुळेच आपलेसे करून घेतले हाेते. त्यामुळेच महाराजांच्या शब्दाखातर आपले आयुष्य पणाला लावणारे नरवीर तानाजीसारखे असंख्य मावळे त्यांना उभे करता आले हा इतिहास आहे. श्रीसमर्थांच्या समाेरच हे सर्व घडत हाेते, नव्हे त्या प्रक्रियेस श्रीसमर्थांच्या शिकवणीचाही माेठाच हातभार हाेता. अनेक लाेकांचे अंत:करण राखत जाणाऱ्यालाच नंतर त्या अनेकांच्या सहकार्यामुळेच भाग्य प्राप्त हाेते.
 
परंतु अभागी म ाणूस हा विवेकाचा विचार समजत नाही आणिकाेणी समजावून सांगू लागला तरीही त्याचे ऐकत नाही, ताे नुसतेच कल्पनेचे इमले बांधून व मनाेराज्ये करीत बसताे. हे करू का ते करू अशा गाेंधळात आळसामुळे काहीच करत नाही आणि त्यामुळे त्याला प्रत्यक्षात काहीही सुख समाधान मिळत नाही. झाेपलेल्याला जागे करता येते; पण झाेपेचे साेंग करणाऱ्याला कसे जागे करणार? अगदी याप्रमाणेच ज्याने पुण्यमार्ग साेडून दिला आहे, अशा करंट्याची पापवासना कमी कशी हाेणार? त्याला काेणत्याही गाेष्टीचे पूर्ण ज्ञान नसूनही ताे वाटेल त्या विषयावर बाष्कळपणे बडबडतच राहताे व त्यामुळे उलट सर्वांना त्याचा खाेटेपणा, हीनत्व व लबाडी कळून येते. शहाण्या माणसाने आपल्याला मि ळालेले आयुष्य नेमकेपणे म्हणजे विचारपूर्वक जीवनाचे ध्येय निश्चित करून त्या दिशेने नियमित व अथक परिश्रम करत सत्कारणी लावले पाहिजे. ज्या माणसाकडे असा निश्चय व त्यानुरूप कृती आढळते असाच माणूस जनप्रिय व जनमान्य हाेताे. आपण शरीराने, मनाने व धनाने जनसामान्यांसाठी झिजलाे नाही, तर कधीही कीर्ती प्राप्त करू शकत नाही.