पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण हाेऊ नये, यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करते. परंतु वर्षभर नाल्यांकडे ढुंकूनही बघितले जात नसून, पावसाळ्याचा कालावधी साेडता इतर आठ महिने नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात.त्यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेने यंदा राेबाेटच्या मदतीने नालेसफाईचा निर्णय घेतला असून, यासाठी मुंबई आयआटीने तयार केलेल्या राेबाेटची यंत्रणा दहा ठिकाणी प्रायाेगिक तत्त्वावर उभारली जाणार असल्याची घाेषणा महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे 300 किमी.चे नाले आहेत. शहराच्या विविध भागांतून हे नाले जातात आणि ते खाडीला येऊन मिळतात. शहरातीलनाल्यांत कचरा फेकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहेत.यामुळे शहरातील नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात. मध्यंतरी वर्षातून दाेनदा नालेसफाई सुरू करण्यात आली हाेती.
मात्र, दाेनच वर्षांत ही पद्धत बंद करण्यात आली.नाल्यांतील कचरा साफ करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात येताे.यानंतरही सफाई याेग्यप्रकारे हाेत नाही.त्यावर ताेडगा म्हणून महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये साचणारा प्लॅस्टिक आणि तरंगता कचरा (फ्लाेटिंग मटेरियल) काढण्यासाठी विशेष यंत्रणा म्हणजेच राेबाेटची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार शहरातील; तसेच खाडी मुखालगत अशा एकूण 10 ठिकाणी मुंबई आयआयटीने विकसित केलेली पेटंटप्राप्त प्रणाली बसवण्यात येणार आहे.महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावर, घाेडबंदर राेड, कल्याण फाटा या अत्यंत वर्दळीच्या आणि अवजड वाहतूक असणाऱ्या; तसेच शहरातील माेठ्या सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई चार मेकॅनिकल स्वीपर मशीन वाहनांद्वारे करण्यात येते.परंतु या वाहनांसाठी किती इंधन खर्च हाेते आणि त्या तुलनेत रस्त्यांची सफाई हाेते का, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित हाेत असून, आयु्नत साैरभ राव यांनीही अशीच काहीशी शंका उपस्थित करत त्यावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.