दूध भेसळखाेरांवर मकाेकानुसार कठाेर कारवाई करणार : नरहरी झिरवाळ

    26-Mar-2026
Total Views |
 

milk 
 
मुंबई शहर, उपनगरांसह राज्याच्या विविध भागांत दुधात भेसळ करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मकाेका) गुन्हे दाखल करून कठाेर कारवाई केली जाईल, अशी घाेषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत केली. दूध भेसळखाेरांवर किरकाेळ कारवाई करून साेडून दिले जाते. अधिकारी आणि भेसळखाेरांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे त्यांचे फावले आहे. भेसळखाेरांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. दूध भेसळखाेरांवर मकाेकाअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी एकमुखी मागणी सभागृहात करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, छापे टाकून दूधभेसळीचा पर्दाफाश करत असते. वर्साेवा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवजितनगर, अंधेरी पूर्वमधील संत लुईस मार्ग अशा एकूण सात ठिकाणी छापा टाकून दूधभेसळीचा छडा लावला आहे. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली हाेती. यापुढे दूध भेसळखाेरांवर कठाेर कारवाई करण्यासाठी मकाेकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घाेषणा झिरवाळ यांनी केली.