हे शहर केव्हा निर्माण झाले याविषयी काेणालाच सांगता येत नाही. जर्मनीच्या इतिहासात याची पहिली नाेंद इ.स. 953 मध्ये झाली. त्यावेळी ‘गुटिंगी’ नावाचे खेडेगाव तत्कालिन जर्मन सम्राट पहिला ओट्टाे याने मारडेबुर्ग येथील माेरित्स धर्माश्रमाला दिले.त्याकाळी लीने नदीच्या दुसऱ्या बाजुला ग्राेना नावाचा ऐतिहासिक किल्ला हाेता. त्यात सम्राट व राजे आपला दरबार व मंत्रिसभा भरवत असत. इ.स. 1180मध्ये हेन्री द लायन या झा्नसाेनी परगण्याच्या ड्यूकने हा किल्ला उद्ध्वस्त केला. त्यानंतर तेथील ‘गुटिंगी’ गाव े बाजार भरवणारे गाव झाले. कारण लीने नदीच्या काठावरचे हे माे्नयाचे ठिकाण हाेते आणि तिथून दाेन महत्त्वाचे व्यापारी मार्ग फुटत हाेते. पुढे इ.स. 1351 ते 1572 दरम्यान हांझीटिक लीगचे हेगगाव माेठी व्यापारी पेठ बनले. नंतर 1618 ते 1648या काळात चााललेल्या प्रदीर्घ युद्धात ही बाजारपेठ नामशेष हाेऊन पुन्हा हे गाव उजाड बनले.
त्यानंतर हानाेफरचा प्रमुख जाॅर्ज दुसरा आउगुस्ट याने या गावात नवे चैतन्य आणले आणि 1734 मध्ये विद्यापीठाची स्थापना केली. आज या विद्यापीठाची महती संपूर्ण जगभर पसरली आहे.या विद्यापीठात सी. एफ. गाैस हे विख्यात गणितज्ञ आणि खगाेलशास्त्रज्ञ, तसेच ग्रिम बंधू हे जर्मन भाषाशास्त्राचे संस्थापक आणि लाेककथाकार असे नामवंत प्राध्यापक शिकवित असत. सुरुवातीला या विद्यापीठात त्या काळातील आवश्यक अशा चार विषयांच्या विद्याशाखा हाेत्या. त्यानंतर गेल्या अडीचशे वर्षांत अनेक संस्था आणि संशाेधन केंद्रे त्यात स्थापन करण्यात आली. या विद्यापीठाला ‘जाॅर्जिया आउगुस्टा’ हे त्याच्या संस्थापकाचे नाव देण्यात आले असून आज त्यात 14 विद्याशाखा आहेत. जर्मनीतील हे एक प्रमुख विद्यापीठ असून त्यात 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थी व 2500 प्राध्यापक आहेत.या विद्यापीठातील अकादमी ऑफ सायन्सेस, मा्नस प्लाॅक यांच्या नावाच्या अनेक संशाेधन संस्था, वैज्ञानिक चित्रपट संस्था, संगीत शिक्षण विभाग, अवकाश संशाेधनाची जर्मन अकादमी आणि वायुगतिशास्त्र संशाेधनाची प्रयाेगशाळा या काही मुख्य ज्ञानशाखा जगभर नावाजलेल्या आहेत.